हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांपैकी शेळीपालन (Goat Breeds) हा व्यवसाय कमीत-कमी खर्चात आणि कमीत-कमी जागेत करता येणारा व्यवसाय आहे. अगदी कमी भांडवलात तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करून अल्पावधीत चांगला पैसा या माध्यमातून कमावू शकतात. याच कारणामुळे आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील शेळी पालन व्यवसायाकडे वळल्याचे आपल्याला दिसून येत आहे. प्रामुख्याने म्हणजे शेळी पालन व्यवसायामध्ये आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे त्याचा देखील फायदा या व्यवसायात (Goat Breeds) करून चांगले यश मिळवता येणे शक्य झाले आहे.
शेळीपालन व्यवसाय करताना उत्तम जातिवंत दर्जाच्या शेळ्यांच्या जातींची (Goat Breeds) निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते. उत्तम जातीच्या शेळ्यांच्या संगोपन करून कमी कालावधीत चांगला नफा मिळवता येतो. त्या अनुषंगाने आज आपण ‘झालवाडी शेळी’ या शेळीच्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत.
‘या’ शेळीचे मुळस्थान कोणते? (Goat Breeds For Farmers)
झालवाडी शेळी ही गुजरात, भारतातील सुरेंद्रनगर आणि राजकोट भागात आढळणारी उल्लेखनीय जात आहे. या शेळ्यांचे दूध, मांस आणि फायबर उत्पादन करण्याच्या क्षमतेसाठी अत्यंत गुणवत्तापूर्ण आहे. परिणामी, या प्रजातीच्या शेळीला खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा पौष्टिक आहार दिल्याने, शेळीपालन व्यवसायातून चांगला नफा मिळवता येतो.
झालवाडी शेळीची वैशिष्ट्ये?
- सर्व प्रकारच्या हवामान, वातावरणाशी, परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता.
- चेहरा किंवा शरीरावर पांढरे ठिपके असलेले काळे किंवा तपकिरी डाग असतात.
- दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने झालवाडी शेळ्यांमध्ये दूध देण्याची क्षमता चांगली आहे.
- या प्रजातीच्या शेळीचा त्यांचा प्रजनन दर उच्च आहे.
किती असते वजन?
शेळीपालन करताना या शेळ्यांचे वजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. सरासरी, प्रौढ, नर झालवाडी बोकडाचे वजन सुमारे 39 किलो असते,. तर मादी ज्याला डॉस म्हणून ओळखले जाते. तिचे साधारणपणे वजन 33 किलो इतके असते. झालवाडी शेळ्या गवत, झुडपे, पाने आणि इतर वनस्पती खातात. त्या कमी-गुणवत्तेच्या चारा खाण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे त्यांचे कमी चाऱ्यामध्ये देखील संगोपन करता येते.