Goat Disease : आपल्याकडे बरेच शेतकरी शेती सोबतच शेळीपालनाचा व्यवसाय करतात. शेळीपालनामध्ये कष्ट कमी आणि नफा जास्त असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बरेच शेतकरी हा व्यवसाय करताना दिसून येतात. शेळ्यांना जास्त खायला लागत नाही त्याचबरोबर खुराक वगैरे मोठ्या गाईंसारखा शेळ्यांचा जास्त खर्च नसतो त्यामुळे अनेक जण शेळीपालनास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील शेळी पालन व्यवसाय करून चांगले पैसे कमवू शकता मात्र तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शेळ्या मेंढ्यांना होणाऱ्या आजारांबद्दल माहिती असणे तुम्हाला गरजेचे आहे. सध्या देखील शेळ्या मेंढ्यांमध्ये एक विषाणूजन्य आजार झपाट्याने पसरत असल्याचे दिसत आहे.

जनावरांची थेट शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा
शेळ्या मेंढ्यांमध्ये सध्या पीपीआर हा विषाणूजन्य आजार पाहायला मिळत आहे. यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत जर मोठ्या गाईंचे पालन केले तर त्या गायींना होणाऱ्या रोगामुळे देखील मोठा फटका बसतो त्यामुळे अनेक जण शेळ्या मेंढ्यांचे पालन करतात. मात्र यातही आजारामुळे पशुपालकांना मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. सध्या पीपीआर हा विषाणूजन्य आजार शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे त्यामुळे पशुपालकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. (Goat Disease) हा आजार झपाट्याने पसरत असला तरी पशुपालकानं काळजी करण्याची गरज नाही कारण यावर उपचारासाठी प्रभावी लाइव्ह अॅटेन्युएटेड पीपीआर व्हायरस लस उपलब्ध आहे.
या आजाराची लक्षणे नेमकी कोणती
- पशूंमध्ये मध्ये अचानक उदासीनता
- नाकातून स्राव,
- पशूंना ताप येणे
- तोंडात फोड येणे
- श्वासोच्छ्वासास अडथळा आणि खोकला
या आजाराचा प्रसार कसा होतो
सध्या झपाट्याने पसरत असलेल्या या आजाराचा प्रसार हवेतील थेंबा द्वारे होतो. हा आजार जर गरोदर माद्यांना झाला तर त्यांची गर्भपात होण्याची देखील दाट शक्यता आहे त्यामुळे पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराच्या सुरुवातीला टप्प्यात डोळ्यातील श्लेषलम त्वचा लाल होते त्याचबरोबर पोट सुजलेले आढळतात तसेच पशुंच्या तोंडाभोवती नोड्यूल दिसतात.
करा हे उपाय
या आजारावर नियंत्रण करण्यासाठी पशुपालकांना काही खास गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी आपल्या पशूंना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आजारी शेळ्या आणि मेंढ्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांना पोटभर चारा देखील देणे गरजेचे आहे.
या ठिकाणाहून करा पशूंची खरेदी विक्री –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पशूंची खरेदी विक्री करायची असेल तर आता हे काम खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पशूंची खरेदी विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटे काम करायचे आहे. तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टाल करायचे आहे. हे ॲप इंस्टाल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या पशूंचा फोटो टाकून त्यांची माहिती देऊन त्या ठिकाणाहून पशूंची खरेदी विक्री करू शकता. ही सर्व प्रक्रिया अगदी मोफत आहे त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन आपले हे अँप इंस्टाल करा.