Goat Farming : ‘या’ तीन जातीच्या शेळ्यांच्या संगोपनातून बनाल लखपती; वाचा… वैशिष्ट्ये?

0
2
Goat Farming Breeds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पशुपालन व्यवसायाला (Goat Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. शेतीतून मिळणारे अनिश्चित उत्पन्न तसेच नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन अनेक शेतकरी सध्या शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरताना दिसत आहे. यात प्रामुख्याने पशुपालन व्यवसायाला (Goat Farming) विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

कमी खर्चातील व्यवसाय (Goat Farming Breeds)

तर पशुपालन व्यवसायात अनेक जण मोठ्या प्रमाणात शेळीपालन (Goat Farming) करत असल्याचे दिसते. गाय किंवा म्हैस पालनाच्या तुलनेत शेळीपालनाचा व्यवसाय कमी पैशांत आणि कमी जागेत सुरू करता येतो. त्यामुळे या व्यवसायाकडे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाले आहेत. अनेकजण शेळीपालनाचा व्यवसाय करून चांगली कमाई करत आहे.

मिळेल भरघोस उत्पन्न

शेळीपालनाचा व्यवसाय हा मुख्यत्वे मांस उत्पादनासाठी केला जातो. यामुळे शेळीच्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध जातींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान, आज आपण मांस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या टॉप 3 शेळ्यांची जातींची माहिती जाणून घेणार आहोत. या जातीच्या बोकडांना बकरी ईदच्या काळात मोठी मागणी असते. यामुळे जर या जातीच्या शेळ्यांचे संगोपन करून चांगले जातिवंत बोकडांची निर्मिती केली तर शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकणार आहे.

‘या’ आहेत शेळ्यांच्या तीन जाती

गोहिलवाडी शेळी : शेळीची ही जात पशुपालकांमध्ये मोठी लोकप्रिय आहे. या जातीचे बोकड बकरी ईदच्या काळात मोठ्या मागणीमध्ये असतात. गुजरात राज्यात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. खरे तर गुजरात वगळता इतर राज्यांमध्ये या जातीच्या शेळीचे पालन होत नाही. त्यामुळे या जातीच्या बोकडांना मोठी मागणी असते. विशेष म्हणजे बकरी ईदच्या काळात यांना अधिक भाव मिळतो. या जातीचे बोकड सरासरी 50 ते 55 किलोचे बनते. या जातीच्या शेळीचे वजन देखील 40 ते 45 किलो एवढे भरते.

जखराना शेळी : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात या जातीच्या शेळीची मोठ्या प्रमाणात पालन होत आहे. या जातीच्या बोकडांना देखील बाजारात मोठी मागणी असते. या जातीच्या बोकडांचे वजन सरासरी 55 ते 60 किलोपर्यंत भरते. यामुळे या जातीचे संगोपन करून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत आहे.

बारबरी शेळी : बारबरी शेळी या जातीच्या शेळीचे देखील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये या जातीच्या शेळीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते. या जातीच्या बोकडांना बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. या जातीच्या बोकडांचे वजन हे 30 ते 35 किलो एवढे असते.