Goat Feed: ‘असे’ करा शेळ्यांच्या आहाराचे व्यवस्थापन!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात शेळीपालन (Goat Feed) हा एक प्रमुख कृषी जोडधंदा आहे. हा व्यवसाय (Goat Farming) प्रामुख्याने मांस उत्पादन (Goat Meat Production) आणि दूध (Goat Milk) उत्पादनांसाठी केला जातो. शेळीपालनात शेळ्यांच्या आहाराची (Goat Feed) विशेष काळजी घेणे गरजेचे असते, कारण यावरच त्यांच्या शरीराची वाढ आणि उत्पादन ठरलेले आहे.

शेळ्यांच्या शरीराच्या सर्व गरजा चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते. जाणून घेऊ या शेळ्यांसाठी वेगवेगळ्या चाऱ्याचे व्यवस्थापन (Goat Feed).

शेळ्यांना द्यायच्या आहारामध्ये हिरवा चारा (Green Fodder), सुका चारा (Dry Fodder) व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. यातूनच सर्व महत्त्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग म्हणजे ड्राय मॅटर (Dry Matter In Fodder) हा खूप महत्त्वाचा असतो. चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हटले जाते. जीवनसत्वे ही कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्यामध्ये वेगळे असते, जसे की, लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये 80 ते 90% पाणी असते त्यात कोरडा भाग 10 ते 20% असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त 10% पाणी असते व कोरडा भाग जवळपास 90% असतो. शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे (Goat Feed) व्यवस्थापन करावे लागते.

  • शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात. त्यामुळे त्यांना नियमितपणे हा चारा मिळेल याची सोय करावी.  
  • शेळीला तिच्या वजनाच्या 3 ते 4 टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक असते. या दृष्टीने एका प्रौढ शेळीला दररोज साधारण 3 ते 4 किलो हिरवा चारा, 750 ग्रॅम ते 1 किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी 200 ते 250 ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा.
  • 15 किलो वजनाच्या पुढे 100 ग्रॅम कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा द्यावा व तो पुढे प्रति 5 किलो वजनास 50 ग्रॅम याप्रमाणे वाढवत जावे. उदाहरणार्थ 20 किलो वजनाच्या शेळीला 150 ग्रॅम.

दूध देणाऱ्या शेळ्यांसाठी उपयुक्त खाद्याचे प्रमाण (Goat Feed)

  • मका 37%
  • शेंगदाणा पेंड 24%
  • गव्हाचा कोंडा 20%
  • खनिज मिश्रण 1%
  • चुना 2.5%
  • मीठ 0.5%
  • हरभरा 15%

वरील संतुलित आहारामध्ये 18% प्रथिने आणि 75% एकूण पचनीय घटक असतात.

पैदाशीचे बोकड आणि शेळ्यांसाठी संतुलित आहार प्रमाण

  • गव्हाचा किंवा तांदळाचा भुसा 45%
  • शेंगदाण्याची पेंड 20%
  • मका किंवा ज्वारी 12%
  • साखरेची मळी 10%
  • डाळीचा भरडा 10%
  • मीठ 1%
  • चुना 1%

वरील संतुलित आहारामध्ये 15% प्रथिने आणि 65 ते 70% एकूण पचनीय घटक असतात.

अशाप्रकारे शेळ्या आणि बोकडासाठी आहाराचे (Goat Feed) व्यवस्थापन केल्यास त्यांची निश्चितच चांगली वाढ होईल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.