Goat Management : पशुपालकांनो, पावसाळ्यात शेळ्यांची घ्या अशी काळजी नाही तर होईल मोठे नुकसान; जाणून घ्या सविस्तर

Goat Management
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Goat Management : अनेक जणांना मोठमोठ्या गाई म्हशी पाळणे शक्य नसते त्यामुळे बरेच जण शेळीपालन हा व्यवसाय करतात. शेळींची किंमत कमी असल्याने शेळी घेण्यासही लोकांना परवडते म्हणून अनेक जण शेळी पालन हा व्यवसाय करतात. योग्य व्यवस्थापन केले तर नफा देखील चांगला राहतो. त्यामुळे अनेकांचा कल शेळीपालनाकडे वळला आहे. मात्र शेळी पालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यातील आर्द्रत नियंत्रण राखण्यासाठी घ्यावे लागते. कारण शेळ्यांना जास्त आर्द्रता सहन होत नाही त्यामुळे त्यांना श्वसनाचे देखील आजार होण्याची दाट शक्यता अस. ते त्यामुळे तुम्ही शेळ्यांची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

जनावरांची थेट शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

अशी घ्या शेळ्यांची काळजी

पावसाळ्यामध्ये आद्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते. त्यामुळे शेळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात शेळीचा गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा त्याचबरोबर खाद्य तसेच गाभण शेळी व करडांची निगा राखावी, लसीकरण या सर्व गोष्टींचे योग्य ते नियोजन करावे जेणेकरून तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही.

पावसाळा सुरू सुरू होण्याआधीचे यांना जंतनाशकाच्या मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर काही लसीकरण असेल तर ते देखील करून घेणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जंताची अंडी आणि गोचीडे यांच्या वाढीसाठी चांगला असतो त्यामुळे शेळ्यांमध्ये गोचीडांचे प्रमाण देखील वाढते परिणामी गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषण करतात आणि शेळ्याअशक्त होतात. त्याचबरोबर त्यांच्या अंगावर खास सुटते अशावेळी बेचेन होऊन खाणे पिणे बंद करतात. त्यामुळे त्यासाठी शेळ्यांच्या अंगावर गोचीडनाशक औषध लावणे देखील खूप गरजेचे आहे.

बऱ्याचदा पावसाळ्यात चिडचिड जास्त असते त्यामुळे आपला गोठा देखील ओला असतो मात्र जर गोठ्यातील जमीन ओली राहिली तर शेळ्यांच्या पायांच्या खुरांमध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. त्यामुळे शेळ्या लंगडतात परिणामी त्यांना ताप येतो, चारा कमी खातात आणि अशक्त होतात त्यामुळे तुम्हाला गोठा कोरडा ठेवण्याची खूप गरज आहे. (Goat Management)

आपल्याकडे अनेकजण शेळ्या चारण्यासाठी सोडत असतात मात्र जर तुम्ही पडत्या पावसामध्ये यांना बाहेर चरायला सोडताय तर वेळी सावध व्हा. जर शेळ्या पावसात भिजल्या तर शेळ्यांना निमोनिया सारखा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शेळ्या शिंकताना, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, त्याचबरोबर शेळ्यांना ताप येतो, धाप लागते इत्यादी लक्षणे ही निमोनियाची आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शेळ्यांमध्ये ही लक्षणे जाणवली तर लगेचच त्यावर उपाययोजना करा जेणेकरून तुमचे जास्त आर्थिक नुकसान होणार नाही.

पाऊस पडून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कोवळा हिरवा गार चारा उगवतो यावेळी आपण शेळ्या चारण्यासाठी सोडतो मात्र यावेळी शेळ्या अधिक प्रमाणात चारा खाणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण की या चाऱ्यांमध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात त्यामुळे शेळ्यांचे अपचन होते, हगवण लागते त्याचबरोबर पोटदुखीचा त्रास देखील त्यांना उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात गाभण शेळीची काळजी घेणे गरजेचे

पावसाळ्यामध्ये आपला गोठा ओला असतो त्यामुळे यावेळी गाभण शेळीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण की गोठ्याची जमीन ओलसर राहिल्यामुळे गाभण शेळी चालताना घसरून पडून त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वतंत्र निवाऱ्याखाली आणि कोरड्या ठिकाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.