Good News! फक्त 500 रुपयांना गॅस सिलेंडर? संपूर्ण माहिती चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Good News) । सर्वसामान्यांसाठी गॅस सिलेंडरची किंमत अतिशय महत्वाची असते. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या कि विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असतात. त्यामुळे गॅस सिलेंडर कमीत कमी रुपयांना उपलब्ध कसा होईल याकडे सर्व सरकारांचे लक्ष असते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता विविध राज्य सरकारे आपापला अर्थसंकल्प सादर करत आहेत. नुकत्याच झालेल्या राजस्थानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस शासित गेहलोत सरकारने केवळ ५०० रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून सर्वसामान्यांची मते जिंकली आहेत.

महाराष्ट्र सरकार येत्या ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प २०२३ – २४ विधिमंडळात सादर करणार आहे. शिंदे – फडणवीस सरकार देखील यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित राजस्थान सरकारने आपल्या अर्थसंकल्पात काय घोषणा केल्यात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. राजस्थान सरकरने ५०० रुपयांना गॅस सिलेंडर देण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्र सरकारदेखील घेईल काय हे आता मार्च महिन्यातच समजणार आहे.

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला इलेक्ट्रिक बैल प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राजस्थानचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांपासून इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व जनतेला गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीवर दिलासा देण्यात आला आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिलिंडर ५०० रुपयांना मिळणार

आता राजस्थानच्या सर्वसामान्यांना अवघ्या 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. एप्रिल 2023 पासून उज्ज्वला योजनेशी संबंधित असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत एकट्या जयपूर शहरातील २,६५,३५४ लोकांकडे, तर ग्रामीण भागातील २,३५,६३५ लोकांकडे गॅस कनेक्शन आहेत. अशा परिस्थितीत आता या सर्व लोकांना सरकारच्या बजेटचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र सरकारच्या या योजनेंतर्गत राज्यातील 76 लाख कुटुंबांना केवळ 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

राजस्थान सरकारने केल्या या घोषणा

सीएम अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या अर्थसंकल्पात इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मोफत वीज योजना सुरू करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच महिलांसाठी बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याबरोबरच ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय राज्यात लवकरच मुख्यमंत्री मोफत अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही गेहलोत यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!