PM Kisan : चांगली बातमी ! पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने ‘ही’ मोठी सवलत दिली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून अन्नदात्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करते आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

ई -केवायसी करण्याची मुदत वाढविली

पी एम किसान (PM Kisan) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11 हप्ते ट्रान्सफर झालेले आहेत. लेटेस्ट अपडेट नुसार ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान चा बारावा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. अशातच सरकारने आणखी एक मोठी खुशखबर दिली आहे. ती म्हणजे पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या अनुसार आता केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणखीन एक संधी दिली गेली आहे. सरकारने आता केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट केली आहे. यापूर्वी 31 जुलै ही अंतिम तारीख होती मात्र ही तारीख आता वाढवण्यात आली आहे त्यामुळे ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी मुदत मिळाली आहे. दरम्यान पीएम किसान चा हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आला आहे.

कसे कराल ई केवायसी

–सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
–येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
–आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
–आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
–सबमिट OTP वर क्लिक करा.
–आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!