हॅलो कृषी ऑनलाईन : सककले मुलाणी कराड
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात शनिवारी फुले पीक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हे कृषी प्रदर्शन आयोजित केल्यामुळे या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. यामध्ये कराड येथील अशोक पाचुंदकर, प्रशांत गरुड विंग, प्रतिभा वेळापूर रेठरे बुद्रुक, द्वितीय क्रमांक ही विभागून देण्यात आला. यामध्ये सविता चांगदेव मोरे सासुरवे तालुका कोरेगाव, गणपती विष्णू मोरे सासुरवे, अजित कुमार जयवंत माळी गिरेवाडी तालुका पाटण, तृतीय क्रमांक ही विभागून देण्यात आला. यामध्ये महेश जाधव चिमणगाव, दत्ताजी चव्हाण पेरले, उद्धव माळी मसूर,
तर उत्तेजनार्थ मध्ये शामराव घोलप कवठे, प्रवीण ताटे आवर्डे, दिपाली पाटील तांबवे, आदर्श पाटील तांबवे, संजय कांबळे उंब्रज या शेतकऱ्यांनी यश मिळवले.
कृषी विभागाचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शनिवारी रविवारी आणि सोमवारी कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.