Goverment Job : प्रत्येकाला वाटते की आपल्याला सरकारी नोकरी असावी कारण सरकारनी नोकरीचा रुबाब काही वेगळाच असतो. सरकारी नोकरी मिळाल्यावर चांगला पैसे मिळतो, राहण्यासाठी बंगला तसेच फिरण्यासाठी गाडी देखील मिळते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्या देखील एका सरकारी नोकरीची बंपर ऑफर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor) होण्याची ही उत्तम संधी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 12वी पास देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.
कुठे निघाल्या आहेत या जागा?
राजस्थानमध्ये कृषी पर्यवेक्षकाची बंपर भरती निघाली आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळ कृषी क्षेत्रातील रिक्त पदे भरणार आहे. यासाठी विभागाने 10 जुलै रोजी अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती राजस्थान मध्ये असली तरी महाराष्ट्रातील युवकांनी खचून जाण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्रामध्ये देखील ही भरती होत असते. याबाबत माहिती सरकार त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकत असते. (Goverment Job)
कधी करता येईल अर्ज?
या नोकरीसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे ते 15 जुलैपासून यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. ज्यांना या परीक्षेसाठी थेट अर्ज करायचा आहे ते राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in वर जाऊन या भरतीसाठी टप्प्याटप्प्याने फॉर्म भरू शकतात.
किती पदांची भरती होणार?
विभागाने एकूण 430 पदांसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. जे 12वी पास आहेत आणि त्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे ते या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा मुलाखतीचा असणार आहे.