मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60 टक्के अनुदान; 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मत्स्यव्यवसाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. केंद्राच्या या योजनेत देशभरातील राज्य सरकारे सुद्धा हातभार लावत असून आपले योगदान देत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरियाणा राज्यात मत्स्यपालन घटकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून अनुदान दिले जात आहे.

हरियाणा मत्स्यव्यवसाय विभागाने राज्याती मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत मत्स्यशेतीकडे शेतकऱ्यांचे आकर्षण वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याकडे वळण्यासाठी एकूण खर्चाच्या 40 ते 60 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. राज्यातील मत्स्यव्यवसायासाठी इच्छुक लोकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले गेले आहेत. त्यामुळे या कालावधीत अर्ज करून इच्छुक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे आणि वेळ वाया घालवायची गरज नाही. आजच तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एका क्लीक वर अर्ज करा. हॅलो कृषीवर या व्यतिरिक्त, हवामान अंदाज, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, सातबारा उतारा, यांसारख्या सुविधा अगदी मोफतमध्ये मिळत आहेत. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी हे अँप डाउनलोड करून Install करा.

Hello Krushi Download करण्यासाठी Click Here

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी तलावाचे बांधकाम, क्षारयुक्त जमिनीत तलाव बांधणे, RAS युनिटची स्थापना, 2 टन, 8 टन आणि 20 टन प्रतिदिन उत्पादन क्षमता फीड मील, घरामागील मिनी RAS युनिटची स्थापना इत्यादीमध्ये मत्स्यपालन करू शकता.

PMMSY अंतर्गत, सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान मिळू शकते तर तर महिला व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 60 टक्के अनुदान मिळेल. या योजनेत जास्तीत जास्त लहान मत्स्यशेतकऱ्यांचा समावेश केला जाईल. तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यातील मत्स्य विभागाशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!