हॅलो कृषी ऑनलाईन (Government Scheme) : राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी नेहमीच वेगवेगळे कृतिशील उपक्रम राबवत असते. शेती व्यवसायात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून सरकार शेतकऱ्यांसाठी मदत करत असते. अशातच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना सरकार कडून राबविण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकते?योजनेला पात्र होण्यासाठी काय अटी आहेत? ही योजना नेमकी काय? याबाबत आम्ही खाली सविस्तर माहिती दिली आहे.

जमीन खरेदी विक्री करण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान या योजनेबाबत नक्की काय आहे?
नवबौद्ध आणि भूमिहीन शेतमजुरांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे हे या योजनेचे मूळ वैशिष्ट आहे. ही योजना २००४ – २००५ पासून सुरू करण्यात आली असून आजवर अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. भूमिहीन आणि नवबौध्द शेतमजुरांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर भर आहे. यात चार एकर जिरायती आणि दोन एकर बागायत जमीन देण्यात येते. मात्र यासाठी या योजनेचा लाभ मिळवणं महत्त्वाचं आहे. Government Scheme
योजनेला अर्ज करण्यासाठी आजच करा हे काम
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी घरी बसूनही लाभार्थी बनू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करावं लागेल. यानंतर सरकारी योजना या विभागात जाऊन सोप्प्या पद्धतीने योजनेसाठी अर्ज करावा. हॅलो कृषी अँप च्या मदतीने तुम्ही तुमचा सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा सहज डाउनलोड करू शकता. तसेच जमीन मोजणी, रोजचे बाजारभाव पाहणे, शेतकरी दुकान आदी सेवांचा मोफत लाभ घेऊ शकता. तेव्हा आज Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता काय आहे?
१) या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी हा अनुसुचित जाती आणि नावबौद्ध असावा.
२) विधवा आणि परितक्त्या महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
३) लाभ घेणारी व्यक्ती भूमिहीन शेतमजूर असावी. (Government Scheme)
४) लाभार्थ्यांचे वय हे १८ ते ६० वयोगटातील असणे आवश्यक आहे.
जमीन खरेदीसाठी सरकारी अनुदान मिळवायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलोअ करा –
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
- आता अँप इंस्टाल केल्यानंतर त्यावर आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करावे.
- आता अँप ओपन केल्यांनतर होम पेजवरच तुम्हाला सरकारी योजना नावाचा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्याला हवी असणारी योजना निवडावी.
- ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान’ या योजनेवर क्लिक करून या योजनेची माहिती मिळवा.
- त्यानंतर अर्ज करण्यासाठी प्रक्रिया करा. यासाठी सुरुवातीला संपूर्ण नाव, प्राथमिक माहिती भरावी.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा.