Government Scheme : राज्यातील अनेक ठिकाणी कोरडवाहू तसेच खडकाळ जमीन आहे त्यामुळे या ठिकाणी लोकांना पाण्याची खूप कमतरता असते पाऊस जरी मोठ्या प्रमाणात झाला तरी या ठिकाणी पाणी साठवा होत नसल्याने या शेतकऱ्यांची शेती पिके व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न असतो. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे उत्पादन देखील घडते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करता येणार आहे.
शेतकऱ्यांना वैयक्तिक अर्ज करता येणार
शेततळ्यासाठी आता शेतकऱ्यांना वैयक्तिक अनुदानासाठी अर्ज करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर हे अर्ज पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करून देणाऱ्या शेततळे योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळते.
किती मिळते अनुदान?
शेततळ्याच्या आकारमानुसार अनुदान ठरवले जाते. ही रक्कम पूर्वी 50 हजार एवढी होती. मात्र ही रक्कम शेततळ्यासाठी पुरेशी नसल्याची अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने आता या रकमेत वाढ केली असून ही रक्कम 75 हजार रुपये करण्यात आली आहे.
मोबाईलवरून घरबसल्या कसा करायचा अर्ज?
शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या कोणत्याही सरकारी योजनेला अगदी सहज अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवर सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे, रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज आदी सेवा विनामूल्य देण्यात येतात. तसेच सरकारी योजना या विभागात जाऊन तुम्ही हव्या त्या शासकीय योजनेला अर्ज करू शकता. तुम्हाला शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यावरील शासकीय योजना विभागात गेल्यानंतर शेततळे योजना नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
योजनेसाठी पात्रता काय?
तुम्हाला जर शेततळे बांधायचे असेल तर यासाठी काही अटी देखील आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अनुदान मिळवायचे आहेत अशा शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्या जमिनीवर शेततळे बांधायचे आहे ती जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा
- आधारकार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.