हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिलं जातं. शेती ही केवळ भारतापूरती मर्यादित नाही, तर जगभरात शेतीचे उत्पन्न घेतलं जातं. या व्यवसायासाठी शेतकरी विविध पिके घेत असतो. मात्र कधीकाळी अवकाळी पावसामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व पिकांचे नुकसान होते. याच काळात शेतकऱ्याला अधिकाधिक कर्ज काढावे लागते. या कर्जापासून मुक्ती मिळावी म्हणून राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली.

सरकारी योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील १५३ लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी व्यापारी बँका आणि मध्यवर्ती बँका कर्ज देत असतात. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीककर्ज मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ लागल्या. यामुळे या योजनेमार्फत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आलं.
या योजनेसाठी घरबसल्या करा अर्ज
शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲप सर्च करा. हिरव्या रंगाचे ॲप दिसेल ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला आवश्यक असलेल्या योजनेची माहिती आणि अर्ज या ॲपद्वारे करता येऊ शकतो.
महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले कर्ज माफी योजना 2023 संपूर्ण तपशील
- योजनेत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत शेतीसाठी कर्ज दिलं जातं.
- त्याचप्रमाणे पूर्वी घेतलेलं कर्ज थकीत आहे. त्यानंतर हेच कर्ज मिळवायचे असेल तर त्या शेतकऱ्यांनाही २ लाखांपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
- २ लाखांपेक्षा जास्त कर्जखाती असतील तर त्या शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही. अर्थातच ते या योजनेसाठी पात्र नसतात.
- या योजनेत सनियंत्रन समिती स्थापन करण्यात आली असून यात वित्त विभाग, नियोजन विभाग, सहकार विभाग, सचिव तसेच रिझर्व बँक, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
- या योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत, खाजगी, व ग्रामीण बँकांच्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पिक अनुउत्पादित कर्जांना किंवा अल्पमुदत पिक पुनर्गठीत अनुउत्पादित कर्जांना (NPA Accounts) कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय वित्त विभाग व सहकार विभागाचे सचिव स्तरीय समिती नेमून त्यांच्यामार्फत घेण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत 11. 25 लाख शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार असून जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 8200/- करोड रुपये जमा केले जातील. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नव्हते. त्यांनी या योजनेच्या तिसऱ्या यादीत (MLPSKY) नाव तपासावे.
या पात्रतेच्या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ
- या योजनेअंतर्गत सरकारी नोकरदार आणि टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस लाभ मिळू शकत नाही.
- अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- फळबाग आणि पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अंगठा आणि सही, शिक्का असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र असावे.
- पासपोर्ट आकाराचे फोटो असावे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे.