हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कृषी विकासासाठी (Agrow Development) अधिकाधिक योजनांच्या माध्यमातून मदत करत असते. यासाठी राज्य सरकारने एक नाही दोन नाही तर तब्बल ५६ कोटींची (56 Cr) मान्यता दिली आहे. हा निर्णय २०२२-२३ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २ मे २०२२ रोजी देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना सोन्याहूनही पिवळी आहे, असे म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
योजनेच्या माध्यमातून हे यांत्रिकी उपकरणांच्या मिळणार सुखसुविधा
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, श्रेडर, उडणारी फॅन, औषध फवारणी पंप, सिंचन पंप, इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेद्वारे पुरविल्या जात असून मागील पाच वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक यंत्राला लाखो रुपयाने अनुदान दिलं आहे. तसेच शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळवायची असल्यास Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा आणि योजनेची माहिती मिळवा. योजनांचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
योजनेला अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा
- गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाच्या लोगोवर जाऊन क्लिक करा.
- मोबाईल क्रमांक, नाव, गाव, इतर माहिती भरून निःशुल्क रजिस्ट्रेशन करा.
- यानंतर Hello Krushi या ॲपवर जाऊन सरकारी योजनां या विभागात जाऊन हवी ती योजना निवडा
- आवश्यक योजनेवर जाऊन apply Now करा. हवी ती माहिती आपल्याला मिळण्यास मदत होते.
असा करा मोबाईलवरून पीक विम्याला अर्ज
शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या.
कोणत्या यंत्राला किती अनुदान
- पंपसेट (७.५ H.P) या पंपासाठी निर्धारित किंमतीत ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १ लाख रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येईल.
- ट्रॅक्टर (४० H.P) ट्रॅक्टर या यांत्रिक वाहनासाठी निर्धारित किंमतीत २० टक्के अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये अनुदान देण्यात आले आहे.
- पॉवर टिलर (8 H.P त्याहून अधिक) पॉवर टिलर या यांत्रासाठी जवळजवळ ४० टक्के ४५ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे.
- ऊस तोडणी यंत्र या यंत्रासाठी निर्धारित किंमतीच्या एकूण किंमतीत २०,००० अनुदान देण्यात आले आहे.
- ट्रॅक्टर फवारणीसाठी यंत्रांसाठी निर्धारित किंमतीत किंमतीत २५ टक्के, ४ हजार रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
आवश्यक कागदपत्र अनिवार्य
- शेतकर्याचे आधारकार्ड
- बँकेचे पासबूक.
- ७/१२ आणि 8 अ.
- जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे बिल
- जर ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.
या शेतकरयांना मिळणार योजनेचा लाभ :
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी.
- अर्जदार जर अनुसूचित जाती आणि जमातीत मोडत असेल तर जास्त प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- ट्रॅक्टरसाठी अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर असावे.