Government Scheme : शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय; आता सरकारी अधिकारी घरी येऊन देणार सेवा, ‘अशी’ बुक करा वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शासन अनेक योजना (Government Scheme), धोरणे लोकांसाठी राबवत असतात. काही वेळा ही धोरणे नागरीकांपर्यंत पोहचत नाहीत. यासाठी आता शासन दरबारी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारी योजनांची होम डिलिव्हरी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये १६ शासकीय सेवांचा प्रायोगिक तत्वावर घरपोच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी (Collector) यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी योजनांची होम डिलिव्हरी सुरु म्हणजे काय?

शासनाच्या योजनांचा अनेकदा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांमधील चुकी यामुळे अनुदान रद्द होते. यावर उपाय म्हणून आता सरकारने सरकारी योजनांची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सेवादूत नावाने विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांनी Hello Krushi अँप इंस्टाल करून सेवादूतसाठी अर्ज केला कि सरकारी कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी येऊन त्याला सरकारी अनुदान मिळवून देणार आहेत.

सरकारी अधिकारी घरी येऊन भरून घेणार अर्ज (Government Scheme)

सरकारी अधिकारी अगदी शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या सेवांचे कागदपत्र घरीच स्कॅन करून घेतील. त्यानंतर ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतील. लाभार्थ्यांचा दाखला किंवा प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला घरपोच नेऊन देतील. यामुळे शेतकऱ्यांचे सरकारी अनुदान मिळवण्याचे काम सोपे होणार आहे.

सरकारी योजनांचा घरी बसून लाभ मिळवण्यासाठी काय करावं?

शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक शेतकरी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ अगदी घरी बसून घेऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे Hello Krushi हे मोबाईल अँप असणे गरजेचे आहे. तुम्ही अजूनपर्यंत हे अँप वापरत नसाल तर खाली दिलेल्या लिंकवर किंवा गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप आजच डाउनलोड करून घ्या. इथे जमीन मोजणी, रोजचे बाजारभाव, सातबारा उतारा डाउनलोड करणे अशा अनेक अतिशय महत्वाच्या सुविधा मोफत देण्यात येतात. Government Scheme

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या उपक्रमात वय व राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, तात्पुरते निवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी. साक्षांकित प्रत, नॉन क्रिमिलेयर, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण अफिडेव्हीट, लघु शेतकरी प्रमाणपत्र, झाडे तोडण्याची परवानगी अशा प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

error: Content is protected !!