Agri Tourism: ‘कृषी पर्यटन’ व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय? तुम्ही घेऊ शकता ‘या’ योजनांचा लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी (Farmer) आता स्मार्टपणे शेती (Agri Tourism) करायला लागला आहे. शेती (Farming) सोबतच अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी तो विविध शेतीपूरक व्यवसायाकडे (Agribusiness) वळलेला आहे. कृषी पर्यटन हा असाच एक कृषिपूरक परंतु चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय (Agri Tourism) म्हणून उदयास आलेला आहे.

शहरातील लोक गावाकडच्या जीवनशैलीची मजा अनुभवता यावी तसेच शेतीबद्दल त्यांच्या मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने कृषी पर्यटन स्थळास हमखास भेट देत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना वर्षभर चालणारा एक व्यवसाय कृषी पर्यटन (Agri Tourism) स्वरुपात मिळाला आहे.

‘शेती पर्यटन’ व्यवसाय (Agri Tourism) सुरू करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. त्यासाठी आपल्याकडे शेती असणे गरजेचे आहे. सध्या शहरात लोकांची गर्दी प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळे कामाच्या दगदगीतून मोकळा श्वास घेण्यासाठी लोक गावी येत असतात. या लोकांना स्विमिंग पूल, रुचकर जेवण, मुलांना खेळण्यासाठी गार्डन, बैलगाडी सफारी या सुविधा उपलब्ध करून देत तुम्ही चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळवू शकणार आहात.

या व्यवसायाला (Agri Tourism) चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून (Maharashtra State Tourism Department) काही लाभ देण्यात आले आहेत. या व्यवसायासाठी शेतकरी वेगवेगळ्या योजनांचा (Government Schemes) सुद्धा लाभ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ त्या बद्दलची अधिक माहिती

कृषी पर्यटन केंद्रासाठी सरकारकडून मिळणारे लाभ

  • ज्या व्यक्तीला कृषी पर्यटन (Agri Tourism) व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यक्तीला पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला बँक कर्ज प्राप्त करता येऊ शकेल.
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण-2016 मधील प्रोत्साहनाचा जसे की उदा. वस्तु व सेवा कर, विद्युत शुल्क यांचा लाभ घेता येईल.
  • कृषी पर्यटन केंद्रासाठी पाणी लागणार असल्यामुळे जलसंधारण विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेचा लाभ सदर व्यक्तीला घेता येईल.
  • त्याचबरोबर नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास राज्य व केंद्र शासना मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यासारख्या योजनांचे फायदे घेता येणार आहे.
  • कृषी पर्यटन केंद्रावर येणाऱ्या लोकांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा लाभ घेता येणार आहे.

नोंदणी प्रमाणपत्र कसे मिळेल?

  • ज्या व्यक्तीला कृषी पर्यटन (Agri Tourism) केंद्र सुरू करायचे आहे त्याला सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागात अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल.
  • त्यानंतर उपसंचालक, किंवा कृषी विभागाचे अधिकारी स्थळाची पाहणी करतील. आणि त्यानंतरच नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • पाहणी करताना अधिकार्‍यांना काही दोष आढळले तर ते प्रमाणपत्र नाकारण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.
error: Content is protected !!