Government Subsidy : शेतकऱ्यांना दिलासा ! ‘या’ शेतकऱ्यांचे पीक सरकार स्वतः विकत घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Government Subsidy) : मार्च महिना हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानदायक ठरला आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Farmers Lose) झाले. मध्य आणि उत्तर भारतात देखील हीच परिस्थिती पहायला मिळाली. या अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. परंतु आता उत्तर प्रदेश सरकार हेच नुकसान झालेले पीक स्वतः विकत घेणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात उन्हामुळे तापमानात वाढ झाली. या तापमानाचा परिणाम हा पिकांवर झाला आहे. या महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, मसूर, हरभरा, मोहरी या पिकांना मोठा नुकसानीचा फटका बसला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने दिलासा दिला आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. पिकांची नासाडी होत आहे. यामुळे आता तुम्ही Hello Krushi ॲप डाऊनलोड करून त्यात अवकाळी पावसापासून पिकांच्या नुकसापासून संरक्षण कसे करता येईल याबाबत माहिती मिळवा.

ॲपद्वारे योजनांच्या सहाय्याने नुकसान झालेल्या पिकांची करा भरपाई

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही हॅलो माध्यम समूहाचे Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केले नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा. रजिस्ट्रेशन केलं नसेल तर मोबाईल क्रमांक, नाव आणि इतर माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारी योजनेची मदत घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळवावी. तसेच या ॲपद्वारे जमीन मोजणी, पशुसंवर्धन, सरकारी योजना, कृषी विपणन, फुलोत्पादन यांबाबत माहिती मिळू शकते. Government Subsidy

उत्तर प्रदेशात गहू, मोहरीचे ५० टक्क्याहून अधिक नुकसान Government Subsidy

उत्तर प्रदेशात गहू, मोहरी या पिकाचे अवकाळी पावसामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशातील १० जिल्ह्यात पीक नुकसानीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३४,१३७ हेक्टर पीक नुकसानीचा अंदाज लावला. आग्रा, बरेली, वाराणसी, लखमीपूर खेरी, उन्नाव, हमीरपूर, झाशी, चंदौली, बरेली आणि प्रयागराजमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. योगी सरकारने कृषी गुंतवणूक सवलत अनुदान देण्याची सूचना जारी केल्या आहेत.

error: Content is protected !!