Government Subsidy : शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील लागवडीच्या खर्चाचा बोजा कमी करता येईल आणि त्यांना चांगल्या उत्पादनातून मोठी कमाई करता येईल. याचपार्श्वभूमीवर आता कांदा लागवडीसाठीसुद्धा शासनामार्फत अनुदान दिले जात आहे.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
नगदी पिकांच्या लागवडीला भरपूर प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषत: फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी बंपर अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील लागवडीच्या खर्चाचा बोजा कमी होऊन त्यांना चांगल्या उत्पादनातून मोठी कमाई करता येईल. यासाठी बिहारमध्ये शेतकऱ्यांना कांदा शेतीवर ५० टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कांदा लागवडीवर अशाप्रकारे अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे.
बिहार सरकारच्या कृषी विभाग, फलोत्पादन संचालनालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘विशेष फलोत्पादन पीक योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना कांद्याच्या क्षेत्राच्या विस्तारासाठी निश्चित केलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाईल.’’ बिहार सरकारने कांदा लागवडीसाठी प्रति हेक्टरी ९८ हजार रुपये युनिट खर्च निश्चित केला आहे. यावर शेतकऱ्यांना ५० टक्के म्हणजेच ४९ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. बक्सर, भोजपूर, नालंदा, पाटणा आणि शेखपुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.