Govt Scheme : शेतकऱ्यांचा आधार बनलीये ‘ही’ योजना; दरमहा मिळतात 3 हजार रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना (Govt Scheme) राबविल्या जात आहेत. ‘पंतप्रधान शेतकरी मानधन योजना’ (Govt Scheme) ही त्यापैकीच एक आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत (Govt Scheme) सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. जर तुमचेही वय 18 वर्ष असेल तर तुम्ही दरमहा 55 रुपये भरून या योजनेत सहभागी होऊ शकता. जर तुमचे वय 30 वर्ष असेल तर तुम्ही दरमहा 110 रुपये, तर तुमचे वय 40 वर्षांहून अधिक असेल तर तुम्ही दरमहा 200 रुपयांचा भरणा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतकऱ्यांना या तीनही रकमा 60 वर्षांचे वय होईपर्यंत भराव्या लागणार आहेत. त्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल.

असा करा ऑफलाईन अर्ज (Govt Scheme For Farmers)

– आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रामध्ये जा.
– या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि जमिनीसंदर्भात विचारलेल्या सर्व बाबींची पूर्तता करावी लागेल, सातबारा जमा करावा लागेल.
– बँक खात्याची माहिती जमा करावी लागेल.
– आपल्या नोंदणी अर्जाला आधार कार्ड सोबत लिंक करा.
– त्यानंतर तुम्हाला पेन्शन खात्यासंदर्भात भराव्या लागणाऱ्या रकमेची माहिती मिळेल.

असा करा ऑनलाईन अर्ज

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. यासाठी तुम्हाला maandhan.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि सर्व माहिती भरावी लागणार असून, संबंधित सर्व माहितीचा एक ऑनलाईन फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही योजनेस पात्र आहात, असे समजले जाईल.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार असून, दरमहा तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात पेन्शन म्हणून जमा केले जाणार आहे. वार्षिक विचार करता शेतकऱ्यांना 36 हजार रुपये पेन्शन या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना म्हातारपणात आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!