कसे कराल हरभऱ्यातील मर व्यवथापन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडी चे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे.

Table of Contents

मर

मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो.

लक्षणे

झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
कोवळी रोप सुकतात.
जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.

व्यवस्थापन

वेळेवर पेरणी करावी.
मोहरी किंवा जवस आंतरपिक म्हणून घ्यावेत.
रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.
पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55

बीजप्रक्रिया

3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे

error: Content is protected !!