हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा ; पहा आजचे हरभरा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय आता पिकाची कापणी होऊन बाजारात हरभऱ्याची आवक होऊ लागली आहे. मात्र सध्याचे खुल्या बाजारातले भाव बघता हरभऱ्याला पाच हजार रुपयांच्या आतच दर मिळतो आहे. शेतकऱ्यांना हरभऱ्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. सोयाबीन, कापूस या पिकांना सध्या चांगले भाव मिळत आहे. मात्र हरभऱ्याच्या बाबतीत तसे नाही काबुली आणि हायब्रीड चण्याला थोडा बरा भाव मिळतो आहे मात्र लोकल चण्याचे भाव अद्यापही पाच हजारांच्या आताच आहेत. नाफेड केंद्रावर ५२३० रुपयांचा भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आपला माल नाफेडवर विकण्यास पसंती देत आहेत. अशावेळी हरभऱ्याची साठवणूक करून नंतर हरभरा विक्रीस काढावा की सध्याच्या दरात हरभऱ्याची विक्री करावी ? कारण आवक आणखी वाढल्यास दरावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चान्याला कमाल आठ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची 24 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव पाच हजार पाचशे रुपये, कमाल भाव आठ हजार आणि सर्वसाधारण भाव सात हजार सातशे रुपये इतका मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज हरभऱ्याला कमाल पाच हजार 700 रुपयांचा भाव मिळाला. तसेच दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कमाल सहा हजार 251 रुपयांचा भाव मिळाला आहे. तरी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल पाच हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला आहे. बाकी इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाले असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल हरभऱ्याची 16,593 क्विंटल इतकी आवक झाली. असून याकरिता कमाल भाव चार हजार 925 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 29-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/03/2022
पुणेक्विंटल35550057005600
दोंडाईचाक्विंटल8625162516251
राहूरी -वांबोरीक्विंटल11410045004300
पैठणक्विंटल7380145604350
उदगीरक्विंटल1580455046404595
भोकरक्विंटल67360144624032
परळी-वैजनाथक्विंटल230437544114400
राहताक्विंटल15430045004425
जलगाव – मसावतचाफाक्विंटल19445144514451
सोलापूरगरडाक्विंटल161437545854415
जालनाकाबुलीक्विंटल24550080007700
तुळजापूरकाट्याक्विंटल75440044004400
लातूरलालक्विंटल16593420049254650
बीडलालक्विंटल86340044014300
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल114430044004350
शेवगावलालक्विंटल15430045504550
मुखेडलालक्विंटल45460046004600
मुरुमलालक्विंटल334420047664483
उमरखेडलालक्विंटल40440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल130440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल206410045504250
जालनालोकलक्विंटल2390370045404450
नागपूरलोकलक्विंटल7600410045324426
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल41424044404330
परतूरलोकलक्विंटल139440045004499
देउळगाव राजालोकलक्विंटल81410045004300
यावललोकलक्विंटल601453051004670
लाखंदूरलोकलक्विंटल21435044004375
काटोललोकलक्विंटल350400045324350
देवणीलोकलक्विंटल85462047114665

Leave a Comment

error: Content is protected !!