दिलासादायक…! हरभऱ्याच्या भावात होणार सुधारणा ; जाणकारांनी वर्तवला अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाची लागवड केली. मात्र सध्याचा बाजारभाव बघता हरभऱ्याला सर्वसाधारण भाव हा प्रति क्विंटल ५ हजाराच्या आताच मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून आहे. नाफेडवर शेकऱ्यांना ५२३० इतका भाव प्रति क्विंटल साठी ठरवण्यात आला आहे. मात्र आता पुढील काळात हरभऱ्याच्या भावात सुधारणा होण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील काळात हरभऱ्याचे दर वाढण्याची शक्यता
देशामध्ये यंदा 131 लाख टन इतका हरभरा उत्पादन होईल असा अंदाज केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र सध्याचे वातावरण बघता पाऊस, गारपीट, लहरी हवामान यामुळे हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन हे 85 ते 90 लाख टन इतके राहणार अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तर नाफेड आणि उद्योगा कडील साठा हा वीस लाख टन असू शकतो. त्यातच भरीत भर म्हणून बफर स्टॉक कमी झाल्यामुळे नाफेड करून हरभऱ्याची वेगानं खरेदी सुरू आहे. एकूणच देशातील मागणी आणि पुरवठा यांचा विचार करता पुढील काळात हरभऱ्याचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हरभऱ्याच्या उत्पादनात भारत आग्रेसर
आपण जर जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर हरभरा हे कडधान्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पीक आहे. हरभऱ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक देशी हरभरा आणि एककाबुली हरभरा. देशी हरभऱ्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भारत आणि आसपासच्या देशांमध्ये होते तर काबुली चण्याचे उत्पादन हे भारताबरोबरच पश्चिमी आशिया आणि इतर काही देशांमध्ये घेतले जाते. जगाचा एकून उत्पादनाचा विचार केला तर भारताचा वाटा हातामध्ये एकूण 69 टक्के इतका आहे. मागील वर्षाचा विचार करता भारतामध्ये 119 लाख टन इतके उत्पादन झाल्याचं सरकारने म्हटले पण व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन 100 लाख टनांच्या आसपास आहे. भारत,रशिया टर्की,अमेरिका,मॅनमार, पाकिस्तान, अमेरिका मेक्सिको इरण ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन केलं जातं . अशा जगभरातल्या एकूण 65 देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यात भारताच्या उत्पादनाचा वाटा अधिक आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक ज्या राज्यांमध्ये हरभऱ्याची उत्पादकता घटण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेतीमाल आणि बाजार अभ्यासक दिनेश सोमानी यांच्या म्हणण्यानुसार देशात यंदा 85 लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पाऊस आणि उष्णतेचा पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पीक कमीच राहिल. आता लग्न समारंभ सुरू झाले आहेत. त्यातच हॉटेल रेस्टॉरंट ही पूर्ण क्षमतेने सुरु आहेत . या क्षेत्रातून हरभऱ्याला मागणी राहील त्यामुळे जून महिन्याच्या शेवटी हरभरा दर सहा हजार रुपयांचा टप्पा गाठू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!