Grapes Cultivation: काय सांगता ! द्राक्षांचा एक मणी 35 हजार रुपये, घडाची किंमत 9 लाख रुपये, विक्री नाही होतो लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, द्राक्ष म्हंटल की तोंडाला पाणी सुटते. आपल्या राज्यात देखील द्राक्षाचे (Grapes Cultivation) चांगले उत्पादन घेतले जाते. एव्हढेच नाही तर द्राक्षे मोठ्या प्रमाणावर निर्यात देखील केली जातात. मात्र आपण आज अशा द्राक्षांविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या एका मण्याची किंमत ३५ हजार तर एका घडाचा ९ लाख रुपयांना होतो लिलाव..

होय शेतकरी मित्रांनो, हे खरं आहे. जगात अशा प्रकारच्या द्राक्षांची (Grapes Cultivation) जात आहे. टेलर रिपोर्टनुसार, 26 द्राक्षांचा घड सुमारे 9 लाख रुपयांना उपलब्ध आहे. दुर्मिळ प्रजाती असल्याने या द्राक्षाची विक्री करण्याऐवजी लिलाव केला जातो.

इतर द्राक्षांपेक्षा 4 पट मोठी

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हे द्राक्ष रुबी रोमन (Ruby Roman) नावाने ओळखले जाते. त्यांची लागवड इशिकावा, जपानमध्ये केली जाते. आकाराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सामान्य द्राक्षांपेक्षा ही द्राक्ष चार पट मोठी असतात. शिवाय इतर द्राक्षांच्या तुलनेत ही द्राक्ष चवीला गोड आणि रसदार असतात. या द्राक्षांच्या एका गडाला 24 ते 26 द्राक्षमणी असतात. 2022 मध्ये लिलावाच्या वेळी 8.8 लाख रुपये पर्यंत ही द्राक्ष विकली गेली आहेत. याशिवाय 2021 मध्ये देखील त्याची किंमत जवळपास एवढीच होती.

कशी सुरू झाली रुबी रोमन द्राक्षांची शेती?

इशिकावा, जपानमधील द्राक्ष शेतकर्‍यांनी 1998 मध्ये प्रीफेक्चरल अॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरला लाल द्राक्षाची विविधता विकसित करण्यास सांगितले. ४०० द्राक्षांच्या वेलांवर प्रयोग केला गेला. दोन वर्षांनी या वेलींना फळे येऊ लागली. 400 वेलींपैकी फक्त 4 वेलींना लाल द्राक्षे आली. यातील केवळ एक जात होती जी कामी आली. आता संशोधकांची टीम द्राक्षांच्या या निवडक जातीची लागवड करते. द्राक्षांचा रंग, आकार आणि चव यांची विशेष काळजी घेतली जाते.

2008 पासून लिलाव सुरू झाला(Grapes Cultivation)

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, 2008 मध्ये ही द्राक्षे पहिल्यांदा लिलावासाठी बाजारात आली होती. 700 ग्रॅम द्राक्षांचा गुच्छ US $ 910 म्हणजेच सुमारे 64,800 रुपयांना खरेदी करण्यात आला. त्यावेळी घडातील एका मण्याचा भाव 1800 रुपयांवर पोहोचला होता. त्याच वेळी, 2016 मध्ये, 26 द्राक्षांचा घड $11,000 म्हणजेच 7,84,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

किंमती भेटवस्तू म्हणून केला जातो वापर

ishikawafood वेबसाइटनुसार, या द्राक्षात भरपूर साखर आणि रस आहे. या द्राक्षांचा एक घासच तुम्हाला रसदार द्राक्षांचा उत्तम अनुभव देतो. हे जपानच्या लक्झरी फ्लॉवर आयटमच्या श्रेणीत येते. लोक मोठ्या आणि शुभ प्रसंगी ही द्राक्षे भेट म्हणून देतात.

error: Content is protected !!