Grapes Diseases: द्राक्ष पिकात घडकुज आणि डाऊनी मिल्ड्यू समस्या दिसून येत आहे का? असे करा व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अनेक द्राक्ष बागांमध्ये (Grapes Diseases) छाटणीनंतर प्री-ब्लूम अवस्थेत सध्या घड कुजणे (Bunch Rotting) आणि डाउनीची (Downy Mildew) समस्या दिसून येते. यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान होते. जाणून घेऊ या द्राक्ष पिकातील घड कुजणे आणि डाउनी मिल्ड्यू रोगाची (Grapes Diseases) कारणे आणि त्यासाठी करावयाचे उपाय.

द्राक्षातील घड कुजणे आणि डाउनी मिल्ड्यू समस्येचे कारणे

फळछाटनी (Grapes Pruning) नंतर बागेत वेलीच्या प्रत्येक काडीवर साधारण चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतो. इथेफॉनच्या वापरामुळे डोळे चांगले फुगलेले असतात. त्यामुळे सर्वच डोळे फुटून निघतात. यानंतर घड पाच पानांच्या अवस्थेत स्पष्टपणे दिसून येतो. ही अवस्था फळछाटणी नंतर साधारणपणे चौदाव्या दिवसानंतर दिसून येते. या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य दिले जाते. वाढीच्या या अवस्थेत पाऊस जास्त प्रमाणात झालेला असल्यास बागेत अचानक आर्द्रता वाढते. प्री-ब्लूम घड अवस्थेत पाऊस झाल्यास या छोट्याश्या कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढू शकते. दोन ओळींमध्ये असलेली मुळे पाऊस झाल्यामुळे कार्यरत होतात. मुळांद्वारे ऑक्सीन्सची उत्पत्ती जास्त होत असल्यामुळे वेलीमध्ये अंतर्गत जिबरेलीन तितक्याच प्रमाणात वाढू लागते. परिणामी, पानांची लवचिकता वाढून वेल अशक्त होतात. प्री-ब्लूम किंवा दोडा अवस्थेत असलेल्या घडांवर पाण्याचे थेंब साचून राहिल्यास कुजेला बळी पडतात. बऱ्याचदा रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी बागेत संपूर्ण घड कुजलेले दिसू शकतात. बऱ्याच बागेत पावसाळी वातावरणात गवतही जास्त वाढते. पाऊस झाल्यानंतर या गवतामुळे जमिनीवरील भागात आर्द्रता जास्त काळ टिकून राहते. ओलांडा ते जमीन हे अंतर कमी असते. ढगाळ वातावरणात हवाही खेळती राहत नाहीत. या दोन्ही गोष्टींमुळे आर्द्रता अधिकच वाढते. हे डाऊनी मिल्ड्युच्या (Grapes Diseases) प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. ही परिस्थिती दाट कॅनॉपी असलेल्या ठिकाणी हमखास दिसून येते.

कुज आणि डाऊनी समस्येसाठी उपाययोजना

कुज आणि डाऊनीचा (Grapes Diseases) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॅनॉपीवर लक्ष देणे आवश्यक आहे. यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

  • घड स्पष्टपणे दिसताच फेलफुटी त्वरित काढून घ्या.
  • वेलीवर झिंक आणि बोरॉन प्रत्येकी 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करून घ्यावी.
  • पालाश (0-0-50) 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी, यामुळे वेल सशक्त होण्यास मदत होईल (Grapes Diseases).

एखादे सायटोकायनीनयुक्त संजीवक कमी प्रमाणात फवारून घ्यावे. पाऊस जास्त झालेल्या परिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी. त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते.

error: Content is protected !!