हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी असून, संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत (Grapes Export) महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. जी जानेवारीपर्यंत एकट्या महाराष्ट्रातून १,६५,७३० मेट्रिक टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात (Grapes Export) वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यनिहाय निर्यात आकडेवारी (Grapes Export From India)
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२२-२३ च्या हंगामात जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातून एकूण १,७५,२३४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये १,६५,७३० मेट्रिक टन नोंदवली गेली आहे. प. बंगाल या राज्यातून गेल्या वर्षी एकूण ७६,९५५ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये ५०,४३० मेट्रिक टन नोंदवली गेली आहे. उत्तरप्रदेश या राज्यातून गेल्या वर्षी एकूण ८,३०७ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये ५,३६१ मेट्रिक टन नोंदवली गेली आहे.
बिहार या राज्यातून गेल्या वर्षी एकूण २,९४७ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये ४,३३२ मेट्रिक टन नोंदवली गेली आहे. ओरिसा या राज्यातून गेल्या वर्षी एकूण ४,३४५ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये ३,१७८ मेट्रिक टन नोंदवली गेली आहे. ओरिसा या राज्यातून गेल्या वर्षी एकूण २४१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. जी यंदा २०२३-२४ मध्ये २९५ मेट्रिक टन नोंदवली गेली आहे.
डाळिंब निर्यातीत सोलापूर आघाडीवर
डाळिंबाची निर्यात तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातूनच सर्वाधिक होते. द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. नाशिक, सांगलीनंतरच्या दोन-तीन जिल्ह्यांत सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. भारतातून तसेच महाराष्ट्रातून गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्ष निर्यात कमीच झाली आहे. भारतातून झालेल्या द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा महाराष्ट्रातून व भारतातून द्राक्ष निर्यात कमी झाली आहे.
निर्यात खर्चात मोठी वाढ
युरोपियन देशांत ज्या मार्गावरून दरवर्षी निर्यात होते तो मार्ग यावर्षी बंद होता. भारतातून जानेवारीपर्यंत दोन लाख ३९ हजार मेट्रिक टन, तर एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातून एक लाख ८१ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाल्याचे पणन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. युरोपियन देशांत नेहमीच्या मार्गावरून कंटेनर वाहतूक खर्च २२०० ते २३०० डॉलर इतका येतो. मार्ग बदलल्याने हाच खर्च ५२०० ते ५३०० डॉलर इतका झाला. याशिवाय नव्या मार्गावरून द्राक्ष उशिराने पोहोचत होती. वाढलेला वाहतूक खर्च परवडत नसल्याने निर्यात घटली आहे. असे पणन महासंघाने म्हटले आहे.