Grapes Farming : 4 एकरात 78 टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन; अहमदनगरच्या शेतकऱ्याची कमाल!

0
2
Grapes Farming Farmer Success Story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक शेतकरी शेतीला आधुनिकतेची जोड (Grapes Farming) देत आहे. ज्यामुळे त्यांना शेतीतून अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत होत आहे. तसेच त्यांना पीक पद्धतीत बदल केल्याने अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी द्राक्ष शेतीतून (Grapes Farming) आपली आर्थिक प्रगती साधली आहे.

मिळवले 32 लाख रुपयांचे उत्पन्न (Grapes Farming Farmer Success Story)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील महाडिक असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते द्राक्ष शेतीतून (Grapes Farming) मोठी आर्थिक उलाढाल करत आहेत. या शेतकऱ्याने द्राक्ष पिकातून ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यांनी केवळ चार एकरांत ७८ टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले. विशेष म्हणजे त्यांना गुजरात, बडोदा, मुंबई या बाजारपेठांमध्ये द्राक्षाला चांगला भाव मिळाला. त्यामुळे त्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे.

पारंपरिक पिकांना फाटा

शेतकरी महाडिक हे याआधी कांदा, ऊस अशी पारंपरिक पिके घेत होते. परंतु या पिकांना बाजारभाव आणि खर्च यातील ताळमेळ पाहता आर्थिक प्रगती मात्र होत नव्हती. त्यामुळे त्यांनी पाच वर्षांपूर्वी चार एकरांमध्ये सुपर सोनाका व एस. एस. एन. या दोन जातींच्या द्राक्ष पिकाची (Grapes Farming) लागवड केली.

किती आला उत्पादन खर्च?

यंदाच्या हंगामात त्यांना द्राक्ष पिकातून ७८ टन द्राक्ष उत्पादन मिळाले आहे. द्राक्ष बार धरण्यापासून मजुरी, औषधे याचा त्यांना एक लाख ७० हजार रुपये खर्च झाला आहे. अर्थात मार्केटचा अंदाज घेऊन सतत नवनवीन प्रयोग करून, विविध पिकांमधून उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हेच शेतकरी महाडिक यांनी दाखवून दिले आहे.

शेणखताचा वापर

महाडिक यांनी एप्रिल महिन्यात छाटणी केली. त्यांनी आपल्या बागेत रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय आणि शेणखताचा जास्त वापर केला. त्यांनी त्यांच्या शेतात एक एकरामध्ये शेततळे केले आहे. विहीर व शेततळ्याच्या माध्यमातून द्राक्ष पिकाला पाण्याची सुविधा केली. दरम्यान अवकाळी पावसाने झोडपल्याने यंदा उत्पादन कमी निघाले असल्याचे शेतकरी महाडिक सांगतात.