हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकरी प्रामुख्याने अधिक बाजारभाव मिळवून देणारी पिके (Groundnut Farming) घेण्याकडे ओढले जात आहे. त्यातच तेलबिया पिकांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी भुईमूग, सोयाबीन या पिकांपासून दुरावले जात आहे. मात्र, अशातही काही शेतकरी हे तेलबिया पिकांचे भरघोस उत्पादन घेत आहे. आज आपण अशाच एका भुईमूग उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी भर उन्हाळ्यात भुईमूग पिकाची लागवड करून, त्यातून त्यांनी एकरी विक्रमी 17 क्विंटल भुईमुगाचे (Groundnut Farming) उत्पादन घेतले आहे.’
आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड (Groundnut Farming Farmer Success Story)
अंकित भोयर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते चंद्रपूर राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील रहिवासी आहे. सध्याच्या घडीला शेतकरी तेलबिया पिकांची प्रामुख्याने पद्धतीने लागवड करतात. मात्र, प्रगतिशील शेतकरी अंकित भोयर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक एकर शेतात आधुनिक पद्धतीने भुईमूग पिकाची लागवड (Groundnut Farming) केली. विशेष म्हणजे त्यांना भर उन्हाळ्यात विक्रमी उत्पादन देखील मिळाले आहे.
किती मिळाले उत्पादन?
सामान्यपणे भुईमूग तीन महिन्यांचे उन्हाळी पीक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून भुईमूग पीक घेतले तर त्याला कमी खर्च येतो. आणि उत्पादनही चांगले होते. असे शेतकरी अंकित भोयर सांगतात. त्यांना यंदा एका एकरात 17 क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळाले आहे. ज्यास सध्या बाजारात सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. ज्यामुळे कमी उत्पन्न मिळणाऱ्या भुईमूग पिकातून त्यांनी नियोजनपूर्वक आर्थिक प्रगती साधली आहे.
आधुनिक पद्धतीचा अंगीकार करावा
“सध्याच्या घडीला शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, गहू, हरभरा पिकांसोबत आधुनिक शेती पद्धतीने पीक घेतल्यास उत्पादन वाढले तर नक्कीच फायदा होतो. त्यामुळे सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करणे गरजेचे झाले आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या जातींचे वाण उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतकरी नक्कीच समृद्ध होईल.” असा सल्ला शेतकरी अंकित भोयर यांनी शेवटी शेतकऱ्यांना दिला आहे.