Groundnut Harvesting : भुईमूग काढणीसाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; मजुरीवरील खर्च वाचणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना भुईमूग काढणीला (Groundnut Harvesting) आला की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मजूर उपलब्ध होणार कसे? कारण भुईमूग काढणी आणि शेंगा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने जुगाड करत भुईमूग काढणी यंत्र बनवले आहे. या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च वाचणार असून, कमी कालावधीत भुईमूग काढणी (Groundnut Harvesting) शक्य होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके कसे आहे हे यंत्र…

शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान (Groundnut Harvesting Machine)

सध्या शेतकरी आपआपल्या पातळीवर जुगाड (Groundnut Harvesting) करून अशी काही यंत्र बनवत आहेत. ज्यामुळे देशभरातील इंजिनिअर्सला देखील त्याबाबत विचार करणे भाग पडत आहे. तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील शेतकरी मोहन सुंदरम यांनी देखील लहान आणि मध्यम शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक यंत्र बनवले आहे. या यंत्राला पोर्टेबल स्ट्रीपर असे नाव देण्यात आले असून, ते भुईमूग काढणी करण्यासाठी वरदान ठरत आहे.

काढणी क्षमता किती?

भुईमूग काढणी करणाऱ्या या यंत्राला स्ट्रीपर नाव देण्यात आले असून, ते 0.2 HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरवर चालते. ही मशीन सर्व बाजूने बंद असते. तर तीन बाजूने मोकळी जागा असून, ती भुईमूग काढणीसाठी ठेवण्यात आली आहे. या मशीनला दोन लोकांच्या मदतीने चालवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. या मशीनच्या माध्यमातून शेतकरी 2 ते 3 दिवसात एक एकर भुईमुगाची काढणी करू शकतात.

मजूर कमी लागणार

या मशीनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना भुईमुगाच्या काढणीसाठी (Groundnut Harvesting) मजूर कमी लागणार आहे. याशिवाय या मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साफ आणि माती विरहित शेंगा मिळण्यास मदत होणार आहे. या मशीनच्या साहाय्याने शेंगांची कोणतीही फुटतुट होत नाही. त्यामुळे आता या मशीनमुळे महिलांचा शेंगा तोडणीचा वेळ वाचणार आहे. हे मशीन सायकलच्या साहाय्याने शेतात कुठेही फिरवले जाऊ शकते.

स्ट्रिपिंग मशीनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना भुईमूग काढण्यासाठी एकरी 2500 रुपये इतका खर्च येतो. शेतकरी मोहनसुंदरम यांची स्वतःची 1.5 एकर शेती असून, ते 40 वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहे. ते आपल्या शेतात भुईमूग आणि धान पिकांची शेती करतात. त्यांनी बनवलेल्या या मशिनमुळे शेतकऱ्यांना भुईमूग काढणीस मोठी मदत होत आहे.

error: Content is protected !!