Sugarcane Price: ऊस दर देण्यात गुजरात ठरला महाराष्ट्रापेक्षा अव्वल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: ऊस दराच्या (Sugarcane Price) बाबतीत महाराष्ट्रापेक्षा (Maharashtra) गुजरात राज्यातील साखर कारखाने (Sugar Factory) कायमच अव्वल असलेले आतापर्यंत दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या (Gujrat) कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कारखानदारांसाठी तो एक प्रकारचा धडाच आहे (Sugarcane Price).

गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांनी (Co-operative Sugar Mills, Gujarat) 2023-24 हंगामात गळीतासाठी दिलेल्या शेतकर्‍यांच्या उसाला अव्वल दर (Sugarcane Price) देत तेथील गणदेवी येथील सहकार खांड उद्योग लि. या साखर कारखान्याने एप्रिल 2024 मध्ये आलेल्या उसाला एकूण तोडणी वाहतूक खर्च धरून 4,675 रुपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले आहे.

प्रतिटन 770 रुपये तोडणी वाहतूक खर्च (Harvesting & Transport Expenditure) वजा करता 3905 रुपये दर ते देणार आहेत. केवळ 11.47 टक्के रिकव्हरी असताना 9 लाख, 14 हजार 499 टन उसाचे गाळप (Sugarcane Sludge) करत 10 लाख, 48 हजार, 330 क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती दक्षिण गुजरात सहकारी साखर मिल असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

गणदेवी कारखान्याने मार्च 3,805 रू. व फेब्रुवारी 2024 करता 3705 रुपये प्रतिटन तसेच जानेवारी 2024 सह डिसेंबर, नोव्हेबर, ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांत आलेल्या उसाला 3605 रुपये टन याप्रमाणे दर (Sugarcane Price) देण्याचे जाहीर केले आहे.

हा दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून शेतकर्‍यांना मिळणारा दर आहे. बोर्डली साखर कारखान्याची रिकव्हरी 10.83 टक्के आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 23 व जानेवारी 24 मध्ये आलेल्या उसाला 3423 रू., तर फेब्रुवारी, 3523, मार्च 3623 रुपये टनांप्रमाणे निव्वळ दर ‘गणदेवी’ देणार आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील कारखान्यांनी दर द्यावा अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे.

ऊस दरात प्रचंड तफावत
गुजरात राज्यातील ऊस दर (Sugarcane Price) पाहता ते दरात अव्वल ठरले आहेत. तसेच गेल्या 17 वर्षांतील महाराष्ट्र व गुजरातच्या ऊस दरातही प्रचंड तफावत आहे.