हॅलो कृषी ऑनलाईन: भुईमुग (Gypsum Application In Groundnut) हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक (Oilseed Crop) आहे. या पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये (Crop Nutrient Management) म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअम (24%) व गंधक (18.6%) हे मुख्य घटक आहेत. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी उपयुक्त ठरतात. जाणून घेऊ या जिप्समचे फायदे आणि वापर पद्धती (Gypsum Application In Groundnut).
जिप्समच्या वापराचे फायदे (Uses Of Gypsum In Agriculture)
- जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढून ती भुसभुशीत होते.
- क्षारपड जमीन जिप्समच्या वापरामुळे सुधारते.
- बियाण्यांची उगवण क्षमता (Seed Germination Capacity) जिप्सममुळे वाढते.
- जिप्सममुळे (Gypsum Application In Groundnut) पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.
- सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
- पिकाची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते.
- फळांची, पिकांची गुणवत्ता (Quality Improvement) सुधारते.
- भुईमुग पिकासाठी कॅल्शिअम व गंधक यांचा पुरवठा करण्यासाठी जिप्सम स्वस्त पडते.
- जिप्सममध्ये कॅल्शिअम (24 टक्के) व गंधक (18.6 टक्के) हे मुख्य घटक आहे.
- शेतकर्यांच्या शेतातील प्रात्यक्षिकामध्ये जिप्समचा उपयोग केलेल्या शेतामध्ये शेंगांचे उत्पादन वाढल्याचे आढळले.
जिप्सम वापर पद्धती (Gypsum Application In Groundnut)
- भुईमुगाची काढणी होईपर्यंत शेतात घातलेला जिप्सम संपतो. म्हणून दर हंगामात या पिकाला जिप्सम द्यावा लागतो.
- भुईमुगाच्या पेरणीपासून 25 ते 35 दिवसांनी फुलधारणेवेळी प्रति हेक्टरी 500 किलो जिप्सम द्यावा.
- जिप्समची बारीक भुकटी फूल धरण्याच्या अवस्थेत जमिनीच्या पृष्ठभागावर शक्य तितकी झाडांच्या बुंध्याजवळ पसरून द्यावी. कारण जमिनीच्या पृष्ठभागाच्या 5 सेंटिमीटर थरातील कॅल्शिअम, आऱ्या व पोसणाऱ्या शेंगांच्या उपयोगी पडतो.
महत्त्वाची सूचना: जिप्समचा वापर (Gypsum Application In Groundnut) करण्यापूर्वी माती परिक्षण (Soil Testing) करून जमिनीचा सामू किती आहे त्यानुसार जिप्समची मात्रा ठरवावी. साधारणपणे 8 पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीमध्ये इतर खतासोबत एकरी 300 ते 500 किलो जिप्समचा वापर करावा.