हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्कात (Harbhara Bajar Bhav) पूर्णतः सूट देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे मागील आठवड्यात हरभरा दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. दरातील ही घसरण सुरूच असून, आज लातूर बाजार समितीत हरभऱ्याची 348 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5450 ते किमान 4900 रुपये तर सरासरी 5200 रुपये प्रति क्विंटल इतका दर हरभऱ्याला (Harbhara Bajar Bhav) मिळाला आहे.
आजचे हरभरा बाजारभाव (Harbhara Bajar Bhav Today 25 Dec 2023)
शनिवारी लातूर बाजार समिती हरभऱ्याची 328 क्विंटल आवक झाली होती. तर त्या ठिकाणी हरभऱ्याला कमाल 5601 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. अकोला बाजार समितीत आज 63 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असून, कमाल 5405 ते किमान 4305 रुपये तर सरासरी 5225 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शनिवारी अकोला बाजार समितीत हरभऱ्याला कमाल 5500 ते किमान 4800 रुपये तर सरासरी 5300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत आज हरंभऱ्याला कमाल 5200 ते किमान 5200 रुपये तर सरासरी 5200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शुक्रवारी काटोल बाजार समितीत हरभऱ्याला कमाल 5245 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. पुणे जिल्ह्यातील मोर्शी बाजार समितीत आज हरभऱ्याला कमाल 5000 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शुल्कमुक्त धोरणाचा परिणाम
केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आणि मसूर आयातीला शुल्कमुक्त परवानगी दिल्याने दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. मात्र रब्बी हंगामातील हरभरा लागवड अजूनही साडे नऊ टक्क्याने पिछाडीवर आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. पावसाअभावी यावर्षी हरभरा उत्पादकताही कमी राहण्याचा अंदाज आहे. प्रक्रिया उद्योगातून सध्या हरभऱ्याला उठाव मिळतोय. तर नाफेडची विक्री मर्यादीत स्वरूपात सुरु झाली आहे. त्यामुळे हरभरा भावाला येत्या काळात आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.