हरभरा बाजारभाव : पुढील 2 महिन्याच्या संभाव्य किंमती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात. भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०-७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. (हरभरा बाजारभाव)

सन २०२१-२२ मध्ये भारतातील एकूण हरभऱ्याचे उत्पादन १३५ लाख टन इतके होते. सन २०२२- २३ मध्ये हरभऱ्याचे अंदाजे उत्पादन सुमारे १३६ लाख टन असण्याची शक्यता आहे. सन २०२०-२१ या कालावधीत भारताच्या एकूण डाळींच्या निर्यातीत सुमारे ६० टक्के वाटा हरभऱ्याचा आहे. सन २०२३-२४ या हंगामासाठी हरभऱ्याची किमान आधारभूत किमत (MSP) रु.५३३५ प्रती क्विंटल आहे. मागील तीन महिन्यातील लातूर बाजारातील हरभऱ्याच्या सरासरी किंमती व भारतातील APMC बाजारातील आवक पुढील प्रमाणे –

मागील काही वर्षातील किमतीचे अर्थमिती विश्लेषण व बाजारातील सद्यस्थिती विचारात घेता, माहे फ्रेब्रुवारी २०२३ या कालावधीत लातूर बाजारात हरभऱ्याच्या संभाव्य किमती रु. ४५०० ते ५००० प्रती क़्कि. राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील २ महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल व मे २०२३) हरभऱ्याच्या किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

error: Content is protected !!