हरभरा रोग व कीड : कडाक्याची थंडी पडल्यावर हरभरा, गहू पिकांवर कशाची फवारणी करावी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात नेहमीच तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळते. यंदाही 2022 वर्ष संपताच राज्यभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेकदा हवामानातील अशा बदलांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. हरभरा रोग व कीड तसेच हरभरा, गहू अशा ऐन भरात आलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आज आपण कडाक्याची थंडी पडल्यावर हरभरा, गहू अशा पिकांवर कशाची फवारणी करावी? पिकांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अजुन एक तुमच्या फायद्याची गोष्ट सांगणार आहोत. आता एकही रुपया खर्च न करता मराठी भाषेतून दर्जेदार कृषी सल्ला घेणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या शेतजमिनीचा सातबारा, नकाशा, डिजिटल सातबारा अतिशय सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. तसेच जमिनीची मोजणीही करता येते. यासोबत आपल्या अजवळच्या सर्व खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करता येतो. तेव्हा आजच हॅलो कृषीच मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

हरभरा रोग व कीड व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम हरभरा, करडई व गहू पिकास होऊ नये म्हणून रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी

शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. हरभरा रोग व कीड

मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला
किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकास रात्री सिंचन करावे. भाजीपाला पिकात 2 टक्के 13:00:45 ची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेंडाझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती
किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकास रात्री सिंचन करावे.

error: Content is protected !!