Havaman Andaj : राज्यात अनेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बळीराजा अतिशय आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची रिपरिप होणार आहे. कोकणात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागात लोकांनी पेरण्यांना सुरवात केली आहे तर काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट आलं आहे. (Havaman Andaj)
‘या’ ठिकाणी पाहा हवामान अंदाज
तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आजच प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये कधी पाऊस पडणार हे देखील तुम्ही पाहू शकता. हवामान अंदाजाबरोबर तुम्ही बाजारभाव, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री, पशूंची खरेदी विक्री इत्यादी माहिती अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.
दरम्यान, पुढचे पाच दिवस जरी पावसाचा अंदाज असला तरी मागील दीड महिन्यात राज्यात खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्या देखील खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. अमरावती विभागात 77 टक्के, लातूर विभागात 61 टक्के, कोकण विभागात 17 टक्के, नाशिक विभागात 59 टक्के, नागपूर विभागात 51 टक्के, कोल्हापूर विभागात 30 टक्के तर पुणे विभागात 31 टक्के, पेरण्या झाल्या आहेत.