Havaman Andaj : ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र मागच्या एक-दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण आगामी काळामध्ये मुसळधार पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. सध्या देखील राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून पावसाला सुरुवात झाली आहे.
तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?
शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे तंत्रज्ञान जसे पुढे जाते तसे आपल्याला देखील पुढे जाणे गरजेचे असते. याच गोष्टीचा विचार करून आम्ही खास शेतकऱ्यांसाठी एक ॲप बनवलेले आहे ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. रोजचा रोज हवामान अंदाज पाहू शकता त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टॉल करा यामध्ये हवामान अंदाज बरोबर तुम्ही रोजच्या शेतमालाचा बाजारभाव, पशूंची खरेदी विक्री, जमीनचा सातबारा उतारा, सरकारी योजना अशा अनेक गोष्टींची माहिती मिळू शकतात त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दरम्यान आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापासून मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे आता मराठवाड्यात पुढील एक ते दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Havaman Andaj)
पावसाचा कमबॅक
राज्यातच लवकर पावसाचा कमबॅक होईल असा अंदाज हवामाना विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मागच्या दोन-तीन दिवसापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. पुणे मुंबई मध्ये देखील पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस जोर धरेल. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील पाऊस चांगला पाऊस होईल.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मागच्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी निराश होते. पेरणी केलेली पीक उगवून आले असून ते सुकू लागली होते मात्र पावसाअभावी पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते मात्र आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठवाडा तसेच अहमदनगर सोलापूर पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते आता. लवकरात लवकर मुसळधार पाऊस पडावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे कारण अजूनही ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणचे नदी नाले कोरडे आहेत.