Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस आता राज्यात पुन्हा परतणार आहे. राज्यामध्ये आता श्रावण सरी सुरू होणार आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस झाला आहे त्याचबरोबर विदर्भात देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान २५ ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे चांगला पाऊस पडला तर पीक देखील चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे. तर मराठवाड्यामधील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलोअलर्ट देखील जरी करण्यात आला आहे.
तुमच्या गावात पाऊस कधी पडणार?
शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात पाऊस कधी पडणार याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास बनवले आहे ज्याचं नाव आहे Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये रोजचा हवामान अंदाज पाहत आहे त्याचबरोबर तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार याची देखील माहिती मिळेल ती ही अगदी मोफ. त त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचा हवामान अंदाज चेक करायचा असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपल्या Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
पुणे जिल्ह्यात पाऊस
पुण्यात देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जरी केला आहे. पुढचे तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसाच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसापासून पुण्यामध्ये देखील हलक्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकरी आनंदात
अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता थोडीफार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी सुकू लागली होती अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस पडला तर पिके देखील चांगले येतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.