Havaman Andaj : हवामान विभागाने सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसतोय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये पावसाची संततधार सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे
येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यांमध्ये पाऊस परतणार असून पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी पहा रोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजच्या रोज ताजा हवामान अंदाज पाहायचा असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा, या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचा रोज हवामान अंदाज अगदी मोफत पाहू शकता. त्याचबरोबर फक्त हवामान अंदाज नाही तर तुम्ही शेतीविषयक सर्व सरकारी योजनांची माहिती त्याचबरोबर शेतमालाचे बाजारभाव, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, शेतकऱ्यांच्या जुगाडांची माहिती इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून मिळू शकतात तेही अगदी मोफत त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
दरम्यान, पावसाने पुणे मुंबई शहर परिसरात रात्रीपासून चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची उखाड्यापासून सुटका झाली आहे. अनेक दिवसांनी परतलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.