Havaman Andaj : सध्या राज्यासह देशांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची पिके पावसा अभावी सुकू लागली होती मात्र राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. (Havaman Andaj)
उत्तराखंडमध्ये बिकट परिस्थिती
उत्तराखंडमध्ये तुफान पाऊस बरसत असून त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरी थांबण्याचा सल्ला देखील दिला आहे. त्याचबरोबर जर फक्त महत्त्वाचे काम असेल तरच कराव बाहेर पडा असा इशारा देखील उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे.
अतिवृष्टी यामुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, ओरिसा, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी पहा हवामान अंदाज
तुम्हाला जर घराबाहेर पडण्याआधी पावसाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही रोजच्या रोज हवामान अंदाज पाहू शकतात तेही अगदी मोफत त्याचबरोबर सरकारी योजना, रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, पशूंची खरेदी विक्री अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्ही मिळू शकतात त्यामुळे लगेचच हे ॲप प्ले स्टोअर वर जाऊन इन्स्टॉल करा.
राज्यात पाऊस कधी?
हिमाचल प्रदेश मध्ये पावसाने थैमान घातले असले तरी राज्यात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे मुसळधार पाऊस पडला पाहिजे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी पावसाच्या जीवावर पेरण्या केल्या असून अद्यापही मुसळधार पाऊस झाला नाही तर पिके जळून जातील असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.