Havaman Andaj : यावर्षी मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला असून जुलै महिना सुरू झाल्यानंतर राज्यभरात पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये सुरुवातीला जुलै महिन्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला त्यानंतर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने दडी मारली पूर्ण ऑगस्ट महिन्याचे वीस दिवस जवळपास कोरडेच गेले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता मात्र हवामान विभागाचा हा अंदाज खोटा ठरला असून मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची दडी पाहायला मिळत आहे. (Havaman Andaj)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देखील पाऊस पडत नाही नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘अब तो ना गरजता है, ना बरसता है’ असं म्हणण्याची वेळ आली आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या पीक उगवून आले आहेत. मात्र गेल्या वीस दिवसापासून पाऊस न पडल्याने आणि कडक उन्हामुळे पिके सुकू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. (Havaman Andaj)
पावसाळा सुरू असून देखील चार नक्षत्र संपले असतानाअपेक्षित पाऊस पडत नाही. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्यात जवळपास 71.60% पावसाची तूट आहे. त्यात आता ऑगस्ट महिना संपण्यासाठी फक्त आठ ते नऊ दिवस उरले आहेत तरी देखील पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हवामान विभागाचा अंदाज पहायचा असेल तर प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही अचूक हवामान अंदाज पाहू शकता त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये कधी पाऊस पडणार याबाबतची देखील माहिती घेऊ शकता त्यामुळे.
दिवसभर फक्त ढगाळ वातावरण
सध्या राज्याच्या अनेक भागात हवामान विभागाने अलर्ट जारी केले आहेत. मात्र हवामान विभागाचे अंदाज खोटे ठरताना दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागात फक्त ढगाळ स्वरूपाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या तुरळक सरी बरसत आहेत. मात्र शेतीला पुरेल असा पाऊस अजूनही झाला नाही अजूनही बऱ्याच ठिकाणी नदी नाले कोरडे आहेत धरणांमध्ये पाणी साठा देखील कमी आहे त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.