Havaman Andaj : श्रावणाचा एक आठवडा उलटून गेला असला तरी अजूनही म्हणावा असा पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. दमदार पावसाचा तीन महिन्यांचा काळ निघून गेला आहे तरीही अनेक ठिकाणी पावसाची मोठी तूट कायम आहे. 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र हवामान विभागाचा हा अंदाज चुकीचा ठरताना दिसतोय अजूनही राज्यातील काही भागात अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (Havaman Andaj )
दरम्यान, अकोला जिल्ह्यात 23 ऑगस्टपर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत 68.6% पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात एकूण 97.4% पाऊस झाला होता. यामध्ये जवळपास 50% तूट असल्याने आगामी काळात शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी पाहू शकता हवामान अंदाज
तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही रोजच्या रोज हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याबाबत देखील तुम्हाला अचूक माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
ऑगस्ट अखेरपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमीच
राज्यातील अनेक भागात अजूनही दमदार पाऊस झाला नाही येत्या आठवडाभराचा पावसाचा अंदाज पाहता ऑगस्ट अखेरपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे. काही ठिकाणी अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र हा पाऊस पुरेसा नाही श्रावणातील दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. कारण दमदार पाऊस झाला तरच इथून पुढे पिके चांगली होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
23 Aug, Maharashtra Rainfall in last 7 days in state.
Parts of Vidarbha and adj areas of Marathwada it rained.
Rest of the places almost no rains … pic.twitter.com/tS2RboQ9ZM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2023
अहमदनगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात देखील पावसाची तूट कायमच आहे. या जिल्ह्यातील अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसाच्या जोरावर खरीप पेरणी केली होती मात्र यानंतर पाऊस येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र अद्यापही पाऊस झालेला नाही. जर अजून पुढच्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांची पिके जळून जातील त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.