Havaman Andaj : मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आता अनेक लोक पावसानेमुळे वैतागले आहेत. अशा लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण आता आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामधील पहिले दहा दिवस कोरडे जाण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Havaman Andaj)
राज्यामधील ठाणे, पालघर, घोडबंदर, नंदुरबार, पुणे, नाशिक आणि साताऱ्यातील घाट क्षेत्रात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील पावसाचा जोर कमी राहणार आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
मोफत पाहा रोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi असे सर्च करून आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचा ताजा हवामान अंदाज पाहू शकता तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याबद्दल देखील तुम्हाला यामध्ये अचूक माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.
आज या ठिकाणी पडणार पाऊस
आज कोकणातील रत्नागिरी, रायगड तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा यलो देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भाला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला असला तरी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात अजून देखील पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचे प्रमाण कमी कमी राहिल्यास या जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई देखील भासू शकते.