Havaman Andaj : राज्यात पावसाचा जोर वाढणार का कमी होणार? पहा हवामान विभागाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : जुलै महिन्यामध्ये तुफान बरसलेल्या पावसाचा जोर आता राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून कमी झाला आहे. तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढचे तीन ते चार दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे.

कोकण आणि विदर्भामधील काही भाग वगळला असता मागच्या काही दिवसापासून राज्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. तर काही भागामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये अद्याप म्हणावा असा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. जर मोठा पाऊस झाला नाही तर पुढील काळात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Havaman Andaj : )

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागातील वातावरण ढगाळ असेल तर पावसाच्या तुरळक सरी अधून मधून बरसणार आहेत. यामध्ये नवी मुंबईत पाऊस काहीसा जोर धरेल पण पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाही.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पुणे आणि मुंबईचा देखील समावेश आहे. पुणे, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या सात ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस कधी पडणार?

तुमच्या गावात पाऊस कधी पडणार याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच प्ले स्टोर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा. यामध्ये तुम्ही हवामान अंदाज अगदी अचूकपणे पाहू शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, पशूंची खरेदी-विक्री, बाजारभाव, सातबारा उतारा, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळू शकता तीही अगदी मोफत त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप इंस्टाल करा.

error: Content is protected !!