Havaman Andaj : सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये थोडाफार का होईना पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात थोडाफार का होईना पाऊस झाला आहे यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. दरम्यान राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
पाऊस पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर विदर्भामध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी विदर्भाच्या काही भागांना देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्यासची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
इथे चेक करा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजच्या रोज हवामान अंदाज चेक करायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही अगदी मोफत रोजच्या रोज हवामान अंदाज चेक करू शकता. फक्त हवामान अंदाज नाही तर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, शेतमालाचे बाजार भाव इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. सध्या २ लाख शेतकरी याचा फायदा घेत आहे त्यामुळे तुम्ही देखील फायदा घ्यावा.
सध्या पावसाला पोषक वातावरण होत असून मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज पावसाचा जोर वाढणार असून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येईल.