Havaman Andaj : ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने अजून दमदार हजेरी लावली नाही. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. मात्र म्हणावा असा पाऊस अजूनही महाराष्ट्रामध्ये झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागामध्ये कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती जाणून घ्यायची असेल तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचे हवामान अंदाज जाणून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सरकारी योजना, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा शेतमालाचे रोजचे बाजार भाव इत्यादी गोष्टी अगदी मोफत जाणून घेऊ शकतात, त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोर वरून hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.
राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली असून काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या वातावरणात हलक्या ते मध्यम सरी बरसताना दिसत आहेत. राज्यात ठीक ठिकाणी ढगाळ हवामान होत असून उकाडा जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या शेतकऱ्यांची उगवून आलेली पिके सुकू लागली आहेत. आगामी काळात पाऊस लवकर झाला नाही तर ही पिके जळून नष्ट होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असल्याने सर्वसाधारण स्थिती उत्तरेकडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्य बांगलादेश परिसरावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे.
दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी – शेतकऱ्यांची मागणी
सध्या राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जनावरांना चाऱ्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. शेतीला पाणी नाही त्याचबरोबर पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा देखील विकत घेण्याची वेळ आली आहे.