Havaman Andaj : राज्यात सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण असले तरी बहुतांश ठिकाणी पावसाची दडी कायम आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाच्या दडीमुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी पिकासाठी एवढा पाऊस पुरेसा नसल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे यामुळे शेतकऱ्यांची उगवून आलेली पिके आता नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मोठा पाऊस हवा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
तुमच्या गावात कधी पडणार पाऊस?
तुम्हाला जर पावसाबाबत अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रोजचा हवामान अंदाज पाहू शकतात. त्याचबरोबर सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, रोपवाटिकांची माहिती इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
दरम्यान, मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ते सर्वसाधारण स्थितीत उत्तरेकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर ईशान्य उत्तर प्रदेश परिसरावर समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
खरीप पिके वायाला जाणार?
राज्यात येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडला नाही तर खरीप पिके नष्ट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या अनेक शेतकऱ्यांची पिके सुकू लागले आहेत. पिकांवर रोटर मारावेत अशी मनस्थिती काही शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र तरी देखील अनेक शेतकऱ्यांना पावसाची आशा आहे पावसाअभावी सोयाबीन कापूस याचे मोठे उत्पादन घटले आहे. जर अजून पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर सोयाबीन, कापूस तसेच इतर पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.