Havaman Andaj : आनंदाची बातमी! विजांच्या कडकडाटासह पावसाचे होणार आगमन; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : देशामध्ये यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसल्यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिना सुरू होताच पाऊस गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता सप्टेंबर महिना सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. या पावसामुळे निदान रब्बी हंगाम तरी चांगला येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. (Havaman Andaj)

या भागात मुसळधार पाऊस कोसळणार

पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटक पर्यंत जात आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी 4 सप्टेंबर नंतर मुसळधार पाऊस पडणार आह. त्याचबरोबर गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागात यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला असल्याचे ज्योती सोनार यांनी सांगितले आहे.

या ठिकाणी चेक करा हवामान अंदाज

तुम्हाला जर दररोजच्या दररोज हवामान अंदाज चेक करायचा असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही दररोजच्या दररोज हवामान अंदाज चेक करू शकता. यामध्ये फक्त हवामान अंदाजच नाहीतर तुम्ही सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, शेतकऱ्यांच्या जुगाडाची माहिती, शेतमालाचे बाजार भाव इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

पुण्यामध्ये पाऊस

मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये देखील पावसाने दडी मारली आहे. यामुळे पुण्याच्या आसपासच्या धरण साठ्यामधील पाणी कमीच आहे. मात्र आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून मागच्या दोन दिवसापासून पुण्यामध्ये पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असणार आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

error: Content is protected !!