Havaman andaj: मागच्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिना चालू झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने वार्तवलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस पुण्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भात पुढचे तीन चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ७ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, काल रविवारी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
या ठिकाणी चेक करा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पावसाबाबत अचूक अपडेट जाणून घ्यायचे असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रोजचा हवामान अंदाज पाहू शकता. फक्त हवामान अंदाजच नाही तर यामध्ये तुम्ही सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकऱ्यांच्या जुगाडाची माहिती इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळू शकतात त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन hello Krushi हे अँप इंस्टाल करा.
बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर येथे 48 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची शेती पिके पावसाअभावी जुळू लागली होती मात्र थोडाफार का होईना पाऊस झाल्यामुळे पिके पिकांना थोडे पाणी बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.