Havaman Andaj : जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस चांगला झाला नसल्यामुळे राज्यामध्ये यंदा मान्सून रुसला असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्ट महिन्यात देखील पावसाने चांगलीच विश्रांती घेतल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पुणे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात फक्त 443.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 332.8 मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे.
परतीचा पाऊस कधीपासून
यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्व राजस्थान मधून सुरू होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 17 सप्टेंबर पासून हा प्रवास सुरू होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास उशिरा म्हणजेच पाच ते आठ ऑक्टोबर दरम्यान होईल असा अंदाज लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरस यांनी वर्तविला आहे.
पावसाची तूट किती?
देशातील अनेक भागांमध्ये ऑगस्टपर्यंत पावसाची तूट निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये पूर्वोत्तर भारतात 17 टक्के कमी पाऊस झाला आहे तर पश्चिम भारतात 8% अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात पहिले तर या ठिकाणी पावसाची 6 टक्के तुट आहे तर दक्षिण भारतामध्ये 16% कमी पाऊस झाला आहे त्यामुळे एकंदरीत विचार केला तर देशांमध्ये 7 टक्के कमी पाऊस झाला आहे.
या ठिकाणी पहा रोजचा हवामान अंदाज
तुम्हाला जर रोजच्या रोज हवामान अंदाज जाणून घ्यायचे असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दररोजच्या दररोज हवामान अंदाज पाहू शकता. त्यामुळे तुमच्या गावात तुमच्या भागात तसेच जिल्ह्यात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी अगदी सहजपणे आणि मोफत मिळणार आहे. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
खरिपाची पिके धोक्यात
जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी पावसाच्या जीवावर पेरणी केली होती मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्याने पेरणी केलेली पिके आता सुकू लागली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी असे देखील शेतकरी मागणी करू लागले आहेत.