Havamn Andaj : सध्या पावसाने राज्यात चांगलीच उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस नाही यंदा मान्सूनही उशिरा दाखल झाला होता. जुलै महिन्यामध्ये पावसाने सरासरी गाठली होती. त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा होऊ लागला होता. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. जुलै महिन्यामध्ये जसा पावसाचा जोर होता तसाच पावसाचा जोर ऑगस्ट महिन्यात देखील कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आता पाऊस कधी पडणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.
तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
आता याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. IMD मॉडेलनुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोकण विभागातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे पण स्पष्ट नाही. मात्र मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहणार आहे असे ट्विट पुणे विभागाचे प्रमुख के होसाळीकर यांनी केले आहे.
राज्यात तुरळक पाऊस
ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. राज्यांमध्ये सध्या कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. परंतु मागच्या पंधरा दिवसापासून राज्यात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे. यामुळे आता शेतकरी देखील पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
इथे चेक करा रोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोज हवामान अंदाज चेक करायचा असेल तर आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप आम्ही शेतकऱ्यांसाठी बनवले आहे. शेतकरी अँच्या माध्यमातून रोजचा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर शेतमालाचे बाजारभाव, जमिनीची मोजणी, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकतात. त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इंस्टॉल करा.
पावसाअभावी पिके सुकली
जुलै महिन्यामध्ये जरी पावसाने काही भागांमध्ये थैमान घातले असले तरी जुलै महिन्यात काही भागात चांगला पाऊस पडला नव्हता. अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यामधील काही भागात म्हणावासा पाऊस झाला नव्हता मात्र या शेतकऱ्यांनी तरी देखील पेरण्या केल्या होत्या. आता या शेतकऱ्यांची पिके उगवून आले असून ती पावसाअभावी सुकू लागली आहेत. जर येत्या पंधरा-वीस दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पिके जळण्याची देखील शक्यता आहे.