Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

तिखट खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होतेय? पळसाची फुले आहेत रामबाण उपाय

Vishal Patil by Vishal Patil
December 17, 2022
in बातम्या, आयुर्वेदिक
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । पळसाचे झाड आपल्या सर्वाना माहिती असतेच. मात्र पळसाच्या झाडाचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत काय? आज आपण पळसाच्या झाडाचे, फुलांचे औषधी गुणधर्म समजून घेणार आहोत. health benefits of palash tree

आपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे. तीन दलांची पाने हे या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य. पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही वनस्पती दिसायला जशी सुंदर, तशी औषधी म्हणूनही गुणकारी असते. या वनस्पतीच्या खोडाची साल, फुले, पाने औषध म्हणून उत्तम कार्य करतात.

पळसाच्या झाडाचे औषधी गुणधर्म खालीलप्रमाणे –
उष्ण तब्येत तसेच जास्त तिखट पदार्थ खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होते. पूर्ण साफ होत नाही. अशावेळी पळसाची फुले वाळवून त्याचे चूर्ण करावे. हे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घ्यावे.
अंगात कडकी भरणे, सतत हातापायांची आग होणे या लक्षणांमुळे त्रास होतो. त्यासाठी रात्री पळसाची फुले ग्लासभर पाण्यात भिजत घालावीत. त्या पाण्यात सकाळी साखर घालून प्यावे. आराम मिळतो.
महिलांमध्ये मासिक स्राव अधिक असेल तर पळसाच्या फुलांचे चूर्ण इतर औषधांसह वापरावे. किंवा फुले पाण्यात भिजत घालून ते पाणी प्यावे.
सूज, गळू यावर पळसाची पाने बांधावीत. पण पोटात औषधे मात्र जरूर घ्यावीत.
खूप गोड खाणे किंवा अन्य कारणांनी पोटात कृमी (जंत) होतात. त्यासाठी वावडिंग, ओवा, पळसाचे बी यांचे चूर्ण १ ग्रॅम प्रमाणात १ ते २ वेळा घ्यावे. हे चूर्ण जंतावर उत्तम काम करते. 
उष्णता, रक्तस्राव यांसाठी पळसाची फुले उत्तम काम करतात.

पळस औषधी वनस्पती आहे. पण या उपचारांच्या जोडीला पथ्य पालन करणे जरुरी आहे.
पथ्य –
खूप तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ वारंवार खाऊ नयेत.
रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे. जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
दारू सेवन, सिगारेट यांसारखी व्यसने टाळावीत.
पाणी भरपूर प्यावे.

काळजी –
मूत्रविसर्जनास वारंवार जास्त त्रास होणे, ताप, अंगदुखी होत असल्यास लघवीची तपासणी करून घ्यावी.
पोटाच्या कडेला दुखणे, लघवी साफ होत नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या कराव्यात.
अंगामध्ये जास्त ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधे घ्यावीत.

Tags: Ayurvediccultivation of medicinal plantsPalash Tree
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group